Posts

Showing posts from July, 2018

वटपोर्णिमा भाग-२

वटपोर्णिमा भाग - २         " महाराज , तुम्ही तर त्या हाडळीची मागणी एका क्षणात मान्य केलीत , तुम्ही तिच्या मागणीला एवढे महत्व कसे काय दिलेत ?" यमदुताने आश्चर्याने यमराजास विचारले . यावर यमराज म्हणाले ,         " अरे काय सांगु , एकदा या वटसावित्रीच्या प्रकरणापायी मी एका धर्मिक संकटात सापडलो होतो आणि तेव्हापासुनच हे वटपोर्णिमा व्रत चालु झालेलं आहे आणि हे व्रत करणार्या प्रत्येक स्त्रीला तिचे अखंड सौभाग्य आणि सात जन्म तोच पती देण्याचा आशिर्वाद मीच तर दिलेला आहे . मी तिची मागणी अमान्य करणे शक्यच नव्हते . त्यामुळे या विषयावर स्त्रियांशी वादविवाद घालण्याच्या भानगडीत मी पडत नाही विशेषकरुन प्रश्न जेव्हा त्यांच्या सौभाग्याचा असतो . तिला तिचे सौभाग्य द्यावेच लागणार . तिला तोच पती सात जन्मापर्यंत मिळणे अनिर्वार्य आहे . त्यामुळे आता तु तिच्या सोनुला उचलण्याची व्यवस्था कर आणि तिच्याजवळ आणुन सोड म्हणजे आपले काम झा...